आरोग्य हीच संपत्ती असून प्रत्येकांनी आरोग्य जोपासावे : खा. अशोकजी ‌नेते

250

– ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे मोफत रोगनिदान शिबिर

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर, ३१ जुलै : आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल. जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आरोग्य हीच संपत्ती असल्याने प्रत्येकांनी आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे, असे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी ‌नेते यांनी केले.

विकासपुरूष, लोकनेते राज्याचे मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे भव्य मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी खा. नेते बोलत होते. पुढे बोलताना खा. अशोकजी ‌नेते म्हणाले, आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो. यासाठी अशा शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे. जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन, जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे व्रत जोपासणारे एकमेव विकासपुरुष, लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हेच आहेत. त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य शिबिर अतिशय चांगला, कौतुकास्पद, स्तुतीमय कार्यक्रम आयोजित केला. अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. आरोग्यम् धनसंपदा हे लक्षात घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. जनतेचे आरोग्य लक्षात घेत महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले. त्यामुळे आजचा वाढदिवस आनंददायी, आरोग्यदायी, आशीर्वाद रूपाने साजरा झाला. याकरिता मी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनापासून, हृदयातून, अंतकरणातून, मनःपूर्वक उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांचे जीवन सुख समृद्ध, आरोग्यदायी, आनंदमय जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी आरोग्य शिबिर कार्यक्रमाप्रसंगी केले.

यावेळी मंचावर वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस, भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिलजी मेंढे, डॉ. अभ्युदय मेघे, अनिलजी गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक देवरावजी भोंगडे, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक परदेशी, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, डॉ. गहलोत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा आरोग्य अधिकारी संजयजी कुमार उपस्थित होते. या शिबिराला डॉक्टर्स, आरोग्य स्टाफ कर्मचारीवर्ग, शिबिराचा लाभ घेणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.