नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी : खा. अशोक नेते

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २८ जुलै : नव मतदार म्हणजे देशाचा कणा. ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण तो व्यक्ती प्रथमतः मतदानाचा हक्क बजावू शकतो म्हणूनच प्रत्येक नव मतदार यांचे १८ वर्ष झाले त्यांनी आपले कर्तव्य बजावत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले आहे. सबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात, भाजपा तालुका अध्यक्ष यांच्याकडे नव मतदार नोंदणीचे फार्म उपलब्ध असल्यामुळे सर्व युवा व नवीन मतदारांनी आपआपल्या तालुक्यात मतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे.

नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करण्याकरिता खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात फार्म उपलब्ध आहेत त्याचप्रमाने तालुका अध्यक्ष, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुका ठिकाणींच्या तहसील कार्यालयात जाऊन नव मतदारांनी आपली मतदार नोंदणी करून आपले नाव समाविष्ट करून घ्यावे. नविन मतदारांनी नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील जनतेला केले आहे.