सिंदेवाही व सावली ग्रामीण रुग्णालयासाठी ७६ कोटींचा निधी मंजूर

59

– आयसीयू बेडसह रुग्णालय होणार अद्यावत ; आ. वडेट्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेडसह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने अखेर आरोग्य प्रशासनाकडून वरील दोन्ही तालुक्याकरिता ७६ कोटींचा निधी मंजूर झाला असून माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक थारा देणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी जनसामान्यांच्या वेदना जाणत कर्करोगाचे महागडी उपचार व जीवित हानी ही गंभीर बाब लक्षात घेत मतदार संघासह जिल्ह्या करिता नुकतीच स्वखर्चातून मोफत कर्करोग निदान अद्यावत ‘कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स’ सुरू करण्यात आले आहे.