अवैध बांबू कटाईच्या चौकशीसाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

91

– आमदार कृष्णाजी गजबे सहअध्यक्ष, मुख्य वनसंरक्षक सदस्य तर विभागीय वनाधिकारी सदस्य सचिव

– विधानसभेत वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची घोषणा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 27 जुलै : जिल्ह्यामध्ये सामूहिक व पेसा अधिकार क्षेत्र तसेच या क्षेत्राबाहेर ग्रामसभांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर अवैद्यपणे बांबु कटाई होत असल्याची लक्षवेधी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत उपस्थित करून वनमंत्र्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभेत वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची केली आहे. या समितीने या संबंधातील संपूर्ण चौकशी व त्यासंबंधीचा टीम अहवाल तयार करून शासनाला पुढील ३ महिन्यात सादर करावा, अशी सूचना केली.

या समितीचे अध्यक्ष गडचिरोली क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, सहअध्यक्ष आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, सदस्य मुख्य प्रादेशिक गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, उपवनसंरक्षक गडचिरोली सदस्य, तर विभागीय वन अधिकारी दक्षता गडचिरोली वनवृत्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील, अशी त्यांनी घोषणा केली.

सदर समिती सामूहिक वन हक्क व पेसा अंतर्गत प्राप्तधिकारानुसार बांबू कटाई करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुधारणा सुचविण्यासाठी काम करेल. सामूहिक वनहक्क, पेसा वनहक्क बांबूच्या जास्त कापणीबाबत आलेल्या तक्रारींची तपासणी व चौकशी करणे आणि योग्य कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात तसेच भविष्यात अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी योग्य धोरणांची शिफारस करणे बांबू रोपवन कार्यक्रमास सुधारणा करणे सामायिक वनात व्यवस्थापन योजना तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी आवश्यकता एक वनविभागामार्फत वेळी पुरवठ्याबाबत शिफारस करणे हे समितीचे कार्यक्षेत्र निश्चित केले असून समितीचा कार्यकाल स्थापन झाल्यापासून ३ महिन्याचा राहील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.