अरविंदभाऊ कात्रटवार यांना वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

20

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे झुंजार नेते व जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या गडचिरोली येथील कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या विजयाची कामना करून त्याविषयी उपस्थित शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस अजा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव हरबाजी मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशभाऊ ताकसांडे, युथ काँग्रेसचे माजिदभाई सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.