केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्याशी खा. अशोकजी नेते यांनी केली विकासात्मक समस्याबाबत चर्चा 

29

– गडचिरोली जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील समस्यांचे निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ जुलै : गडचिरोली जिल्ह्य हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अविकसित आकांशीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात हिरा, पन्ना, सोना, मॅग्नेट, लोहा मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्याचबरोबर मोठ मोठे उद्योगधंदे, कारखाने नाहीत. हा उद्योगविरहित जिल्हा आहे. जिल्ह्याचा सार्वभौम भौगोलिक विकास झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुद्धा आहे. या विविध समस्यांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्याशी खा. अशोकजी नेते यांनी नवी दिल्ली येथे चर्चा करून निवेदन सादर केले.

गडचिरोली जिल्हा जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला असल्यामुळे येथील रस्ते, रेल्वे लाईन या संबंधित अनेक समस्या येत असतात. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये भौगोलिक सोयी सुविधा चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा, जेणेकरून या क्षेत्राला नक्की यांचा फायदा होईल, असेही खा. नेते यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

जिल्ह्यात रेल्वेलाईन ही वडसा (देसाईगंज) येथे एकमेव असून वडसा (देसाईगंज) – गडचिरोली हा रेल्वे मार्ग (३२२) तीनशे बावीस कोटीचा सर्वे टेंडर झालेला आहे. लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर एकुण पाच बँरेजेस मंजूर झाले आहेत. त्यापैकी चिचडोहचे काम पूर्ण झाले असून कोटगल बँरेजेसचे काम चालू आहे. तीन बँरेजेसचे काम लवकरच चालू होणार असल्याची माहिती खा. नेते यांनी अमितजी शाह यांना दिली.

या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे गडचिरोलीला येणार असून कोनसरी प्रोजेक्ट व बँरेजेसच्याही उद्घाटनाला यावे, अशी विनंती सुद्धा खासदार अशोकजी नेते यांनी यावेळी केली आहे. यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रांतील तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा यांच्याशी भेटीदरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.