कार्यकर्त्यांना मोठे करून पक्ष संघटन मजबूत करू : प्रशांत वाघरे

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ जुलै : कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्याकार्यांना मोठे करून पक्ष संघटन मजबूत करण्यात येणार आहे. अंत्योद्याचा विकास हेच भाजपचे विचार आहे. पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या व प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी आणि संघटनशक्ती मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत करू, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी आज, शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ग्रामीण भागाचा विकास करणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश आहे. कार्यकर्ता हीच पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला योग्य स्थान देऊन पक्षाचे संघटन वाढविण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित बॅनरबाजी न करता सेवा कार्य करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे माणुसकीचा ध्यास घेऊन अन्नदान व फळवाटप करण्यात आले. तसेच जेप्रा येथील एका गरजूला सायकल वितरित करण्यात आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी हा उपक्रम आज राबविण्यात आला. हा उपक्रम केवळ एक दिवस न राबविता सेवा कार्याचा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकर परिषदेला भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपचे गडचिरोली शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, ओबीसी नेते तथा चामोर्शीचे नगरसेवक आशीष पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भास्कर बुरे, रमेश अधिकारी, अनिल तिडके, हर्षल गेडाम, विलास नैताम, चेतन गोरे, दीपक सातपुते आदी उपस्थित होते.