महाराष्ट्रातील पहिले ‘कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स’ जनतेच्या सेवेत !

99

– माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर, १३ जुलै : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील पहिले ‘कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स’ आज महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित केले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग हॉस्पिटल ऑन व्हील्स महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचून कर्करोगाची तपासणी करणार असून ज्यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यात शोधून रुग्णांना जीवनदान देणार आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही, अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे या उपक्रमाचे अंतिम ध्येय असल्याचे प्रतिपादन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी याप्रसंगी केले.