गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्री सहायता कक्ष स्थापन करण्यात यावे

51

– रेखाताई डोळस यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

विदर्भ कांती न्यूज

गडचिरोली, 9 जुलै : गडचिरोली जिल्ह्यात जिल्हयाचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी पालकमंत्री सहायता कक्ष स्थापन करावे, अशी मागणी भाजपा महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने गडचिरोली येथे आगमन झाले असता त्यांचे पोलिस विभागाच्या हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली जिल्हा भाजपा महिला आघाडीचे वतीने हार्दिक स्वागत केले व प्रामुख्याने सौ. रेखाताई डोळस यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.

गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांची मुख्यालयात मोठ्या संख्येने अनुपस्थिती हा गंभीर असून तत्काळ यावर राज्य सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच गडचिरोली जिल्ह्य आदिवासी बहुल उद्योग विरहित जिल्हा असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सतत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या लोकनेत्याच्या आधाराची नितांत आवश्यकता आहे. तसेच महाराष्ट्र राज्य अटल अर्थ सहाय्य योजना अंतर्गत राज्य सरकार द्वारे 77 कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे व सदर रक्कम समस्त सहकारी संस्थांना वाटप करण्यात येणार आहेत याबद्दल राज्य सरकारचे सौ. रेखाताई डोळस यांनी आभार मानले.