आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे आजारग्रस्तांना आर्थिक मदत

77

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : स्थानिक शहरातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत देण्यात आली. शेकडो कॅन्सर ग्रस्तांना व अपंग, गोरगरीब व निराधार लोकांना आ. वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते.

सावली शहरातील कृष्णा पैकुजी शिंदे हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. तसेच याच शहरातील मोसम संजय मोहुर्ले यांचा प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात दोन्ही डोळे निकामी झाले. घरातील युवा मुलावर संकट आल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट निर्माण झाले. त्या कुटुंबाला आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन गोहणे यांनी तत्काळ माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर गरजू लोकांना आर्थिक मदत मिळवून दिली.

मदत देताना सावली शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष लता लाकडे. बांधकाम सभापती साधना वाढई, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोनपत्तीवार, नगरसेवक नितेश रस्से, नगरसेविका ज्योती शिंदे, अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडवार, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या कविता मुत्यालवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, बादल गेडाम आदींची उपस्थिती होती.