मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 8 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम आज, 8 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी 11 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास एम. आय. डी. सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे उपस्थिती राहील. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत) गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा (व्ही. सी. द्वारे) होणार आहे.

त्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानसभा आमदार देवराव होळी, विधानसभा आमदार कृष्णाजी गजबे, विभागीय आयुक्त नागपूर विभाग विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर परिक्षेत्र गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.