मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ८ जुलैला होणाऱ्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून योजनांचा लाभ घ्या : आमदार डॉ. देवरावजी होळी

31

– मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार जिल्हास्तरीय कार्यक्रम

– एमआयडीसी गडचिरोली येथील परिसरात कार्यक्रमाचे आयोजन

– शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजुंनी त्या त्या कार्यालयात नोंदणी करावी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 8 जुलै : महाराष्ट्र सरकारने शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्या योजनांचा लाभ गरिबांनाही मिळावा यासाठी “शासन आपल्या दारी” हा उपक्रम संपुर्ण राज्यात सुरु केला आहे. त्याच उपक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ८ जुलै २०२३ रोजी एमआयडीसी गडचिरोली परिसरात करण्यात आले आहे . त्याकरिता लाभ घावयाचा योजनेत नोंदणी करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

आपल्याला ज्या शासनाच्या योजना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्या संदर्भातील नोंदणी आपल्या ग्रामपंचायत स्तरावर, मंडळ स्तरावर, नगरपंचायत, नगरपरिषद व संबंधित विभागाकडे करून “शासन आपल्या दारी” या नव उपक्रमाचा लाभ घ्यावा. असेही आवाहन त्यांनी केले आहे. या कालावधीत वार्षिक गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात, मोठ्या गावांत आयोजन करण्यात आले. गडचिरोली येथे या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन एमआयडीसी परिसर गडचिरोली येथे करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजुंनी नोंदणी करावी, असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हा वासियांना केली आहे.