गुरूशिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही : प्रमोद पिपरे

57

– कुरखेडा येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

विदर्भ कांती न्यूज

कुरखेडा : जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याचे योग्य मार्ग दाखवणारे म्हणजे गुरू होय. दरवर्षी गुरूच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव आपण साजरा करीत आहोत. मानवी जीवनातील गुरुच्या महत्वाला साधुसंतानी व ऋषीमुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अति उच्च कोटीचे आहे. त्यामुळे जीवनात आपण गुरूंचा आदर करायला हवा. गुरूशिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले. कुरखेडा येथे 3 जुलै रोजी आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गुरू पौर्णिमेच्या निमित्याने विनोद बिहारी महाराज (डोंगरगाव) हे कुरखेडा येथे आले असता कुरखेडा येथील प्रतिष्ठित व्यापारी पुंडलिकजी तोंडरे यांच्या निवासस्थानी महाराजांच्या उपस्थितीत गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांनी गुरू पूजन केले व गुरूचा आशीर्वाद घेतला.

याप्रसंगी पुंडलिक तोंडरे व त्यांचे कुटुंबीय गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी माजी जि. प. सभापती नानाभाऊ नाकाडे, जि. प. चे माजी कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपचे गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, आत्माराम कुथे, प्रकाश बारसागडे, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे व त्यांच्या पत्नी, सुखदेव लांजेवार, कावळे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, कोमल बारसागडे, अर्चना निंबोड, अंजली उरकुडे तसेच कुरखेडा येथील नागरिक, महिला सहभागी झाले होते. गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी नागरिक व महिलांनी गुरू पूजन केले व गुरूंचे दर्शन घेतले.