शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे : खा. अशोकजी नेते

60

– जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया, 6 जुलै : जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा गोंदिया या कार्यालयाकडून नियमीतपणे केंद्र शासनाच्‍या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनामध्‍ये वैयक्‍तीक लाभाच्‍या भाग आहे. त्‍यामुळे दारिद्रय रेषेखालील व इतर ग्रामिण क्षेत्रातील लोकांना लाभ देण्‍यात यावा. शासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने करावे, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले.

गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समन्वय व सनियंत्रण समितीची सभा (दिशा) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोंदिया- भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिलजी मेंढे सहअध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला प्रामुख्याने जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल, जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधिक्षक निखिल पिंपळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, समिती सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम सभा अध्यक्ष खासदार अशोकजी नेते यांचे वृक्ष देऊन स्वागत करून प्रकल्प संचालक जाकडेकर मॅडम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया यांनी प्रास्ताविक केले. यानंतर सभेला सभा अध्यक्ष यांनी अधिकारी वर्ग यांचा परिचय घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली.

या सभेत पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणा करण्यात आलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्थेसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरिता जिल्हा विकास यंत्रणा, समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) या सभेचे आयोजन करणे गरजेचे आहे. गरीब कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनामध्ये लाभ देणे, तसेच स्‍वयंसहायता बचतगटांची स्वयंरोजगारासाठी कर्ज प्रकरणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत केली जातात. लाभार्थींना आपले उत्पन्नं वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उदयोग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे. अशा योजना लाभार्थीच्या फायद्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकारी वर्गानी माझं गाव, माझा जिल्हा, माझी जनता अशा पद्धतीने नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठीं अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे‌. अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या अडीअडचणीं असतात. अनेकदा अधिकाऱ्यांच्या तक्रारीही असतात. अशावेळी लोकप्रतिनिधी आम्ही आहोत खासदार, आमदारापर्यंत काही अडचण असेल तर थेट न घाबरता सांगितले पाहिजे. अशावेळी निश्चितच मार्ग काढला जाईल, पण जनतेच्या कामात कंजुशीपणा केली तर खपवून घेतल्या जाणार नाही. मी जेवढा साधा आहे तेवढाच कठोरपण आहे. पण अधिकारी वर्गांनी जनतेच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष दयावे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे हा उद्देश असुन आपण अधिकारी वर्गांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश देत खा. अशोकजी नेते यांनी विकासाची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आभार करत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व समन्वय व सनियंत्रण समितीची सभा (दिशा) आनंदात हसत खेळत झाली असे वक्तव्य करत समारोप केला.