कारवाफा आश्रमशाळेत प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात

68

– मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ जुलै २०२३ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे शुक्रवार, 30 जून रोजी प्रवेशोत्सव कार्यक्रम व पालक मेळावा उत्साहात पार पडला.यावेळी नवागतासह सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्पाने स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय देवतळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव नेताम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश नरोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पुंगाटे, पोलीस मदत केंद्राचे पीएसआय प्रल्हाद पवार, संपर्क अधिकारी विश्वजीत काळे, अधीक्षक जी. एस. सानप, शालिक मडावी, संतोष परसे, विठ्ठल सिडाम, चांदणी नैताम, निता गावडे, राजू उसेंडी, प्रकाश अलाम आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम शाळेत शिक्षणाचे नवचैतन्य वातावरण निर्माण होण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यातून बँड पथकाच्या साह्याने प्रभात फेरी काढून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. शालेय परिसर रांगोळीने सजविण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी विद्यार्थिनीने शिक्षणावर आधारित नृत्य सादर केले. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती तसेच डीबीटी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचारी लता बोदेले यांचा कुटुंबासह शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च माध्यमिक शिक्षक सी. डी. नळे तर संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. आभार उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, माध्यमिक शिक्षक व्ही. व्ही. चव्हाण, वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैताम, झेड. एच. फाये, आर. बी. पिपरे, आय. एम. कुमरे,अधीक्षिका पुष्पा चव्हाण, क्रीडा शिक्षक अभय कांबळे, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.