२ जुलैला गडचिरोलीत वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा

46

– महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन केल्याची आमदार डॉ. देवरावजी होळी यांची माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ जून २०२३ : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपुर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने गडचिरोली येथे २ जुलैला महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे दुपारी ४ वाजता वनमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सभेचे प्रमुख तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली आहे.

या सभेला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णाजी गजबे, विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, माजी मंत्री राजे अंबरीशराव आत्राम, सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरड्डीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.