भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ संवाद कार्यक्रम

47

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जून : ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या अभियाना अंतर्गत 27 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वा. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा मेरा बुथ सबसे मजबूत’ संवाद कार्यक्रम भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सर्व बुथ प्रमुखांसोबत थेट संवाद साधला व विविध राज्यातील भाजप बुथ प्रमुखांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. याप्रसंगी संवाद कार्यक्रमात उपस्थित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी कार्यक्रम पाहिला व ऐकला तसेच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शन ऐकून घेतले व त्यांच्या चांगल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, मनोहर चलाख, दर्शीता प्रमोद पिपरे, नंदनवार काकाजी, हेमके काकु, स्वप्नील कोसरे व नागरिक उपस्थित होते.