विदर्भ क्रांती न्यूज
चामोर्शी : रासायनिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले असून शेती हा नफ्याचा व्यवसाय होण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करुन उत्पादन घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
चामोर्शी येथील साधूबाबा कुटीमध्ये पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या सदस्य निवडीकरिता आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे सेंद्रिय शेती उपक्रम राबवून घेतलेल्या उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था उभी करण्यात येणार असल्याचेही भाई रामदास जराते यांनी सांगितले.
चामोर्शी तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावागावात शेकापक्षाच्या शाखांची स्थापना करण्यासंबंधाने आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले.
या बैठकीला पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तितिक्षा डोईजड, गायत्री मेश्राम, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, श्रीकृष्ण नैताम, राजू केळझरकर, पवित्र दास, देवराव शेंडे, अनिमेश बिश्वास, मारोती आगरे, भैय्याजी कुनघाडकर, प्रशांत मंडल, सुभाष आकलवार, दिपक मिस्त्री, महाराज मंडल, गुरुदास हुलके, हेमंत बोदलकर, अनिल आगरे उपस्थित होते.