भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष विलासराव गुडेल्लीवार यांचे खासदार अशोकजी नेते यांनी केला सत्कार

34

– अहेरी येथे भाजपातर्फे जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : नरेंद्रजी मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भाजपातर्फे मोदी @ 9 हे महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत अहेरी येथील माता कन्यका मंदिरात जेष्ठ कार्यकर्ता सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी 1982 ला आपल्या मोजकया सहकाऱ्यांना सोबत घेत कठिन व विपरीत परिस्थितित अहेरी शहरात भारतीय जनता पार्टिची गडचिरोली जिल्ह्यातील पहिली शाखा उघड़नारे तत्कालीन भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष तथा पहिले जिल्हा संघटन महामंत्री विलासराव गुडेल्लीवार यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन खासदार अशोकजी नेते यांनी सत्कार केला.

भाजपाची स्थापना 1980 ला झाल्यावर जुन्या कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बीजे रोवली आज पक्षाचे वटवृक्ष झाले आहे, जुन्या पिढीतील भाजपा कार्यकर्त्यांचे योगदान आणि त्याग पक्ष कदापी विसरणार नाही, आपला योग्य तो सन्मान पक्षातर्फे केला जाईल, असे प्रतिपादन ह्यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी केले. या कार्यक्रमासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.