भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी कटिबद्ध : ना. अरविंदसिंह भदौरिया

52

– गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टीचे मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत व्यापारी संमेलन

विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राच्या भाजपातर्फे भव्य व्यापारी संमेलन लँडमार्क हॉटेल गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगीं ना. डॉ. अरविंदसिंह भदौरिया सहकार आणि सार्वजनिक सेवा व्यवस्थापन मंत्री, म.प्र., गुजरातचे राज्यसभा खासदार श्री. रामजीभाई मौकरिया, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, खासदार रामदासजी तडस, भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुक प्रमुख किसनजी नागदेवे, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रदेश सरचिटणीस एस.टी.मोर्चा चे महामंत्री प्रकाश गेडाम, धर्मपाल मेश्राम, भाजपा संघटन जिल्हा महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री तथा विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे उपस्थित होते.

उपस्थितांना मध्यप्रदेश येथील सहकार आणि सार्वजनिक व्यवस्थापन मंत्री नामदार डॉ. अरविंदजी भादौरिया, गुजरातचे खासदार रामजी भाई मौकरिया, खासदार रामदासजी तडस, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी श मार्गदर्शन केले.
मध्यप्रदेश येथील सहकार आणि सार्वजनिक सेवा व्यवस्थापन मंत्री नामदार डॉ. अरविंदसिंह भदौरिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शनात बोलताना या देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेन्द्र मोदीजी यांनी नव वर्षाच्या कार्यकाळात प्रामुख्याने देशातील व्यापारी उद्योजक याच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले व गेल्या नऊ वर्षात भारतीय जनता पक्षाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी काम केले आहे. तसेच भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य व्यापारी उद्योजक यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन यावेळी केले.

या कार्यक्रमात गडचिरोली व चामोर्शी येथील स्थानिक व्यापारी बांधव यांनी मध्यप्रदेश येथील सहकार आणि सार्वजनिक व्यवस्थापन मंत्री नामदार डॉ. अरविंदसिंह भदौरिया यांचा व्यापारी हरीश गांधी, गजानन भांडेकर, गडचिरोली येथील व्यापारी हेमंत राठी यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील वीस तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठित उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गडचिरोली जिल्हा मोदीजी @ ९ जनसंपर्क समिती जिल्हा गडचिरोली, भाजपा जिल्हा गडचिरोली व गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते