आज हाॅटेल लॅन्डमार्क येथे व्यापारी संमेलन

46

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मोदी @ 9 महा- जनसंपर्क अभियान अंतर्गत गडचिरोली- चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र अंतर्गत गडचिरोली विधानसभेतील व्यापारी संमेलन आज, शुक्रवार 9 जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता हाॅटेल लॅन्डमार्क चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातील कामे व्यापाऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता व्यापारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटक सहकारिता तथा लोकसेवा प्रबंधन विभाग मंत्री (मध्यप्रदेश शासन) डॉ. अरविंदजी भदौरिया, संमेलनाचे अध्यक्ष गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, विशेष अतिथी म्हणून वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदासजी तडस तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, सहकार नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, अनु. जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव रेखाताई डोळस, व्यापारी असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष रवी चन्नावार, व्यापारी असोसिएशन गडचिरोलीचे सचिव गुरुदेव हरडे, व्यापारी असोसिएशन गडचिरोलीचे कोषाध्यक्ष मनोज देवकुले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा संघटन महामंत्री तथा मोदी @ 9 चे संयोजक रवींद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा महामंत्री तथा मोदी @ 9 चे सहसंयोजक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी केले आहे.