खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

47

– खा. अशोकजी नेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशात आणि राज्यात १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे परमपूज्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वल व पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमांच्या आयोजन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय व समानतेसाठी संघर्ष केला. समाजातील दीनदलितांमध्ये समानता आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरित आहेत. त्यांची शिकवण आणि त्यांचा विचारांचे अनुसरण केल्यामुळे त्यांचं आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस एसटी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी सभापती रंजिताताई कोडाप, अनु.जाती मोर्चा जिल्हा महामंत्री साखरे, शहराध्यक्षा अर्चनाताई निंबोड, जिल्हा सचिव महिला आघाडीच्या गिताताई हिंगे, जनजाती महिला मोर्चाच्या महामंत्री वर्षाताई शेडमाके, माजी सभापती वैष्णवी नैताम, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नगरसेवक देवाजी लाटकर, अनिल पोहनकर,अनिल कुनघाडकर, प्रा. उराडे, गोवर्धन चव्हाण, अविनाश विश्रोजवार, डेडूजी राऊत, विवेक बैस, श्रीकांत पतरंगे, नितेश खडसे, हर्षल गेडाम, जैराम चलाख तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.