लोहार व तत्सम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

58

– गडचिरोली येथे लोहार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आपल्या विदर्भात असणाऱ्या लोहार, गाडी लोहार ,घिसाडी लोहार,घिसाडी, चितोडी लोहार ,राजपूत लोहार, पांचाळ लोहार, गुजराती लोहार, खाती , खातवाढई वाढई (सुतार) जिनगर इत्यादी लोहार व तत्सम जमाती व तिच्या उपजमातींचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करून या समाजाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी आपण शासन स्तरावर लावून धरू व त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लोहार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मेळावा विश्वकर्मा जयंती व विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी केले.

यावेळी मंचावर गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, लोहार समाजाचे नागपूर महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य चरणदासजी बावणे ,विशेष अतिथी श्री ऋषीजी येरमे, माजी नगराध्यक्षा सौ योगिताताई पीपरे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे ,लोहार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी मांडवगडे, अनिलभाऊ पोहनकर, नंदूभाऊ कुमरे यांचे सह गणमान्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.