मनुष्याच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी कीर्तन प्रबोधनाची आवश्यकता : खा. अशोकजी नेते

53

– सत्यपाल महाराज यांचा घाटी येथे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी कीर्तन प्रबोधनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून मनुष्याची मन बदलून सत्याच्या मार्गाने मनुष्य जीवनात परिवर्तन केले पाहिजे. परंतु आज जग बदलत आहे. संस्कृती बदलत आहे. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आजच्या काळात सुद्धा कीर्तन प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या भव्य जाहीर कीर्तनात उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटनीय मार्गदर्शन केले
यावेळी अध्यक्ष भाजपा ज्येष्ठ नेते सहकरमहर्षि प्रकाश सावकार पोरेड्डीवार, सहउद्घाटक आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जिल्हा उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्रभाऊ गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेशभाऊ वालदे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकजभाऊ खरवडे, शिवसेना तालुकाप्रमुख आशिषभाऊ काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, महादेव पाटिल नाकाडे, सरपंच मोहिनी गायकवाड, उद्धव गाहने व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा गजबे यांनी समाज प्रबोधन किर्तनात मार्गदर्शन करताना सांगितले. कीर्तनातून माणसाचे आचार विचार हे शुद्ध होत असतात व कीर्तनातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते असे विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारमहर्षि प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार हरिराम वरखडे, आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते सुरेंद्रसिंह चंदेल, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी उपस्थित समस्त कीर्तन प्रेमी नागरिक बंधू – भगिनी यांना प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनपर कीर्तन ऐकण्यासाठी जिल्हाभरातील विविध तालुक्यातील हजारो नागरिक कीर्तन प्रेमी बंधू भगनीनीं कीर्तन ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येत उपस्थित होते.