छल्लेवाडा येथील अपघातग्रस्त रुग्णांच्या मदतीला धावून आले माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

30

– अपघातग्रस्तांना केली आर्थिक मदत, गंबीर रुग्णांना रेफर करण्याच्या दिल्या सूचना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कधीही कुठलीही परिस्थिती असो सर्वांच्याच मदतीला हाकेला धावून जाणारे व प्रत्येक गरजूला मदत करणारे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दानशूर राजे मनुन पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत, काल तेलंगणा येथे लग्न समारंभ आटोपून मूळगावी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे परत येताना वांगेपल्ली गुडेम पुलाजवळील वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने वाहनाचा रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात काही प्रवासी गंभीर जखमीं झाले ते अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. ही माहिती मिळताच क्षणांचाही विलंब न करता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचुन अपघातग्रस्तांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना आर्थिक मदत केले, तसेच गँबिर रुग्णांना चंद्रपूर रेफर करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना ह्यावेळी सूचना दिल्या तसेच ह्या पुढेही काही मदत लागली तर मला निःसंकोचपणे सांगा मी मदत करेन असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित कुमार अवधेशराव बाबा आत्राम, विकास उइके नगरसेवक न.पं अहेरी, विनोद जिल्लेवार सोशल मीडिया संयोजक अहेरी विधानसभा, विकास तोडसाम, रविभाऊ जोरीगलवार हे होते.