Home गडचिरोली गुढीपाडव्याला ‘बी फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉलचा शुभारंभ

गुढीपाडव्याला ‘बी फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉलचा शुभारंभ

370

– अभिनेत्री किशोरी शहाणे येणार गडचिरोलीत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीत असलेले गडचिरोली शहरातील ‘बी फॅशन प्लाझा’ कापड दुकानाने आता कात टाकली आहे. ग्राहकांची आणखी पसंती लक्षात घेता गडचिरोली शहरातील मूल रोडवर नव्याने उभ्या केलेल्या भव्य इमारतीत ‘बी फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉल उभारला आहे. या शॉपिंग मॉलचा भव्य शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर २२ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे गडचिरोली शहरात येणार आहेत.


सध्याच्या काळातील ग्राहकांची पसंती लक्षात घेत ‘बी फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ उभारला आहे. या मॉलमध्ये आता शानदार फॅन्सी कपड्यांचा मोठा खजाना ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. याशिवाय विविध फॅन्सी कपड्यांसोबतच फूट वेयर व कास्मेटिक वस्तू वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. या शॉपिंग मॉलच्या शुभरंभाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बी फॅशन प्लाझा परिवार गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!