कोडसेपल्ली येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त कोडसेपल्ली येथे नंबर १ सी.सी. क्रिकेट क्लब, कोडसेपल्ली यांचे वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले, ग्रामीण भागातील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्थरावर जाण्यासाठी प्रत्येक गावांत विविध क्रिडा स्पर्धा होणे आवश्यक आहे, ह्यासाठी मदत करायला मी सदैव तत्पर आहे, तुमच्या क्षेत्रात कोणतीही समस्या असो माझाकडे या, २४ तास जनतेसाठी माझे द्वार खुले आहेत असे प्रतिपादन ह्यावेळी बोलतांना राजे साहेब ह्यांनी केले, ह्यावेळी मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी मनीषा बोड्डाजी गावडे माजी.जि. प.सदस्य, विलास मडावी सरपंच ग्रा.पं. मांडरा, जोगा वेलादी पोलीस पाटील मदगु, मालू तलांडे, पोलीस पाटील कोडसेपल्ली, वंजाजी गावडे,जेष्ठ नागरिक कोडसेपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.