पुलवामा शहिदांना कारगील चौकात आदरांजली

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील कारगील चौकातील शहीद स्मारक येथे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय शूरवीर सैनिकांना काल मंंगळवारी मेणबत्ती व फुल वाहून आदरांजली वाहण्यात आली.

१४ फेब्रुवारी २०१९ ला सारा जग प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा करित असताना आपल्यावर दिवस रात्र प्रेम करणारे भारतीय सैनिकांंवर जिवघेना हल्ला करून भीषण हत्याकांड घडवून आणले होते. आपण प्रेमाचा दिवस न साजरा करता आपण भारतीय सैनिकांंवरील प्रेम कायम ठेवू या, या उदात भावनेने कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोलीच्या वतीने शहिदांना आदराजली वाहण्यात आली.
यावेळी कारगील चौकाचे अध्यक्ष उदय धकाते, नरेश चन्नावार, पत्रकार सुरेश पद्मशाली, डॉ. नरेश बिडकर, सुनील देशमुख, सुचिता धकाते, मोबीन सय्यद, कालु गोवर्धन, रुपेश सलामे, मोगली मसराम, रोहित आत्राम, पोलीस जमादार भुवनेश्वर गुरुनुले, प्रसाद पवार, संदीप कटकुरवार, मुंगेलवार, विलास जुवारे, विजय बारापात्रे, शरीफ शेख, भोजू, राजू डोंगरे, अजय शिडाम, अंकित कुळमेथे, महादेव कांबळे, तुषार दुधबळे आदी उपस्थित होते.