पोटेगाव आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती गुरुवारला उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक डॉ. एस. डी. गोटमवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, चुन्नीलाल पारधी, अधीक्षिका एल. आर. शंभरकर, संगणक शिक्षक रजत बारई आदी उपस्थित होते.

यावेळी मनिषा पोटावी, सुष्मिता वड्डे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. संचालन सुधीर शेंडे यांनी केले. आभार पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.