व्हाईस ऑफ मीडियाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी गठित

59

– अध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार, सरचिटणीसपदी कैलाश शर्मा तर सहसरचिटणीसपदी मुक्तेश्वर म्हशाखेत्री यांची निवड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ४ जानेवारी २०२३ : व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारीणी 3 जानेवारी 2023 रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित बैठकीदरम्यान गठीत करण्यात आली. या बैठकीत व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडमवार तर सरचिटणीसपदी कैलाश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून नासीर हाशमी, महेश गुडेंटीवार, उपाध्यक्ष आनंद दहागावकर, नंदकिशोर वैरागडे, शरीप कुरेशी, क्रिष्णा वाघाडे, सहसरचिटणीस मुक्तेश्वर म्हशाखेत्री, कोषाध्यक्ष संदीप कांबळे, कार्यवाहक किशोर खेवले, निलेश सातपुते, संघटक सतीश राचर्लावार, विनोद नागपूरकर, गोविंद चक्रवर्ती, राजू सहारे, प्रवक्ता विष्णू वैरागडे, प्रसिध्दी प्रमुख दुर्योधन तरारे, सदस्य नितीन ठाकरे, दिगांबर जवादे, सचिन जीवतोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी पत्रकारांच्या हिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.