विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील यांच्या सारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्यांचे निलंबन करुन हुकुमशाही पद्धतीने सभागृह चालवणाऱ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी. मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बदनामी करू नका अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा असूनही सत्ताधारी पक्षाचे १४ लोकप्रतिनिधी बोलतात. मात्र विरोधी पक्षाच्या एकच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही हा विरोधी पक्षावर एक प्रकारे अन्याय आहे.
सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना देखील विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब केले जाते. या सरकारच्या कामकाजा विरोधात आदरणीय जयंत पाटील यांनी आवाज उठवला. त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. पंरतु केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
या हुकुमशाही सरकारने जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हाउपाध्यक्ष प्रसाद पवार, राकाँ तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, फहीमभाई काझी, रायुकाँ तालुकाध्यक्ष श्रीधर येरावार, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, जिल्हा संघटन सचिव महेश टिपले, विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, तालुका कार्याध्यक्ष चेतन गद्देवार, शहर कार्याध्यक्ष हिंमाशू खरवडे, तालुका उपाध्यक्ष हिराजी शेंडे, सुनिल बोदलकर, सरपंच जगदीश मडावी मारोडा, प्रसेनजित शहारे, सागर दडमल, पराग दांडेकर अंकुश झरली, हितेश निकुरे, सार्थक बोरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.