महेश कोलावारांच्या कवितेने केले प्रेक्षकांना मंञमुग्ध

65

– वि. सा. संघाचे ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनातील तिसऱ्या दिवशीचे कविसंमेलन झाले लक्षवेधी

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व सुर्याेदय शिक्षण मंडळ चंद्रपूर तसेच सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर द्वारा आयोजीत गेल्या तीन दिवसापासून स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन सुरु आहे.दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिला सञ असलेल्या ‘गोंडवानातील कविता’ हे सञ कवी संमेलनाध्यक्ष कवी रेवानंद मेश्राम अतिथी कवी प्रवीण आडेकर यांच्या उपस्थितीत काव्यमय मैफील रंगली.

या कविसंमेलनात प्रसिद्ध कवी महेश कोलावार यांनी
‘आई तुझ्याविना जगणं म्हणजे?’ ही कविता सादर करुन प्रेक्षकांना मंञमुग्ध केले. तसेच आईविषयीची महती सांगितले. या कवीसंमेलनाचे संचालन सुनील बावणे यांनी केले आहे.

यावेळी धनंजय साळवे, अर्चना जुनघरे पोटे, संतोष कुमार उईके, अरुण घोरपडे, शंकर लोढे, सरिता पिट्टलवार, चंदू झुरमुरे, विवेक पत्तीवार, महेश कोलावार, सुनिल पोटे, प्रवीण तुरानकर, शिरिष दडमल, वर्षा मनवर, मनिषा पेंदोर, अनिल पिट्टलवार, संभाशिव गावंडे, जितेंद्र रायपुरे, अर्जून मेश्राम, रामकृष्ण चणकापुरे, नारायण परांजपे, नरेश गंधारे, ज्ञानेश साहेब, अक्षय गहुकर, भैरव दिवसे आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.