भाजपच्या महिला आघाड्या सक्षम करा

62

– भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखाताई लुंगारे यांचे प्रतिपादन

गडचिरोली येथे भाजप महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २३ डिसेंबर २०२२ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजपच्या महिला आघाड्या मजबूत व बळकट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष माननीय चित्राताई वाघ तथा वरिष्ठ भाजप नेत्यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला आघाड्या सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून भाजपा च्या महिलांच्या जिल्हा व तालुका कार्यकारणी अपडेट कराव्यात व सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियामध्ये सक्रिय रहावे व सर्वांचे फेसबुक, ट्विटरचे अकाउंट बनवणे यासाठी सर्व महिलांनी परिश्रम घ्यावे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी योजनाची माहिती अति दुर्गम क्षेत्रातील सर्व सामान्य महिलांपर्यंत पोचविण्याचे कार्य तसेच त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेखाताई लुंगारे यांनी केले. गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना भाजप महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रभारी माननीय आसावरी देशमुख म्हणाल्या, महिला आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुका कार्यकारणी अपडेट करून सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे फेसबुक ट्विटर अकाउंट उघडून त्या माध्यमातून भाजपचे वरिष्ठ नेते व महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा महामंत्री यांना फॉलो करून रिट्विट करावे. तसेच ज्या महिलांचे फेसबुक अकाउंट नाही त्या सर्वांचे फेसबुक अकाउंट तयार करायला लावून त्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये सक्रिय राहावे व भारतीय जनता पार्टीकडून आलेले केंद्र व राज्य शासनाचे कार्य, योजना व माहिती महिलापर्यन्त व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांनी करून महिला आघाडी सक्षम करण्यावर भर द्यावा व महिला पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रभारी आसावरी देशमुख यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिला जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 20 डिसेंबर रोजी सर्किट हाऊस (शासकीय विश्रामगृह) कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पूर्व विदर्भ प्रभारी मा . सुरेखाताई लुंगारे, भाजप महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रभारी मा.आसावरी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, भाजप महिला आघाडी गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई भांडेकर, शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा महिला ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे, माजी जीप सभापती रंजीता कोडाप, अहेरी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे, धानोराचे माजी पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, जिल्हा महामंत्री अर्चनाताई ढोरे, जिल्हा युवती प्रमुख प्रीती शंभरकर, माजी सरपंच अनिता राय , महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका नीता उंदीरवाडे, माजी नगरसेविका अलकाताई पोहनकर, शहर महामंत्री रश्मीताई बानमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव ज्योती बागडे, पुष्पाताई करकाडे, महिला आघाडीच्या सोशल मीडिया प्रमुख यिशा फ़ुलबांधे उपस्थित होत्या. बैठकीचे संचालन योगिता पिपरे यांनी तर आभार वर्षा शेडमाके यांनी मानले.