इंदिरानगर येथे रात्रकालीन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन

84

– वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २३ डिसेंबर २०२२ : अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 23 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे (cricket spardha) उद्घाटन आज, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा  श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते राहतील. मुख्य अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी, आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे, माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव महाराज आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जि  प. अध्यक्ष योगिता भांडेकर माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, जिल्हा महामंत्री अनिल तिडके, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31,000 रुपये , द्वितीय 21,000 रुपये तर तृतीय पारितोषिक 11,000 रुपये ठेवण्यात आले असून विजेत्या संघाला आकर्षक चषक देण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील क्रिकेट संघांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.