Home चंद्रपूर नरभक्षी वाघांचा त्वरित जेरबंद करा : खा. अशोक नेते

नरभक्षी वाघांचा त्वरित जेरबंद करा : खा. अशोक नेते

192

– निलसनी पेठगाव, रुद्रापूर, खेड़ी येथे भेट व कुटुंबाला आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, १९ डिसेंबर २०२२ : तालुक्यातील वाघाचे (tiger) वारंवार हल्ले होत असून महिनाभरातील आठवड्यात तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात दोन शेतकरी (farmer) व एक महिला (woman) मजुराचा समावेश आहे. यात रुद्रापूर येथील बापुराव कांबळे, खेडी येथील स्वरुपा येलट्टीवार यांचा सलग बळी गेला तर आठवडाभरापुर्वी निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी गेला. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघाचा तत्काळ बंदोबस्त करुन नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करावे, अशी सूचना गडचिरोली – चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते (MP Ashok nete) यांनी गोसे कार्यालयातील विश्रामगृहात आढावा बैठकी दरम्यान वनअधिकाऱ्यांना केल्या. तालुक्यात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून जनजीवन भयभीत होत आहे  महिनाभरात दोन पुरुषासह एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. याची गंभीर दखल घेत खसदारानी तालुक्याचा दौरा केला आणि आढावा बैठकीच्या माध्यमातून वन अधिकाऱ्याना सूचना देऊन वाघाचा त्वरित बंदोबस्त करावे, अशी सूचना दिली.

वाघाच्या हल्याची गंभीर समस्या लक्ष्यात घेत खासदारानी या भगाची पाहणी करण्यासाठी तत्काळ दौरा केला आणि वनअधिकाऱ्यांंसोबत आढावा बैठकीचे आयोजन गोसे विश्रामभवनात केले. त्यावेळी खासदार अशोक नेते, ड़ी. एफ़. ओ. खाडे, ठाणेदार आशिष बोरकर, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोम्मावार, निखिल सुरमवार, नीलम सुरमवार, छाया शेंडे, मयूर गुरनुले, राकेश विरमलवार, मनोज अम्रजवार, प्रसाद जकुलवार, प्रकाश गड्डमवार आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील वनात वाढत असलेल्या वाघाच्या संख्येत मोठी वाढ निर्माण झाली आहे. वाघा – वाघात वनात (forest) संघर्ष निर्माण होत असल्याने अनेक वाघ मृत अवस्थेत (death tiger) वनात आढळून येतात तर काही वन्यजीव मनुष्य वस्तिकडे धाव घेतात, अशी माहिती वन अधिकाऱ्यांंकडून सांगितली जाते. त्यामुळे वन्यजीव आणि मानवात संघर्ष पेटायला लागला आणि निरपराध जीव जान्याचि वेळ निर्माण झाली. अशा गंभीर बाबीकडे वन विभागाने त्वरित लक्ष केंद्रित करुण हानी होणार नाही यावर उपाययोजना निर्माण कराव्यात, आशा सूचनाही यावेळी खासदार महोदयाकड़ून वन अधिकाऱ्यांंना देण्यात आल्या. वाघाच्या दहशतीने निर्माण झालेली भयावह परिस्थितिचा आढावा घेत वाघाच्या हल्यात ठार झालेल्या तालुक्यातील तिन्ही कुटुंबियाची सत्त्वन करुन आर्थिक मदत यावेळी खासदार महोदयामार्फत देण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. विशेष म्हणजे वाघाच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून जनजीवन भयभीत आहे. त्यामुळे मार्निंग वाक, शेतात जाणे, घरी राहने भीतिदायक ठरत आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान होत आहे. अशा गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करत वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी सूचना यावेळी आढावा बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांनी वनअधिकाऱ्यांंना दिल्या.

error: Content is protected !!