अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेध आंदोलन

99

– शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांकडे वेधणारी लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 19 डिसेंबर 2022 : जिल्ह्यातील शेतकरी (farmer), शेतमजूर, कामगार, बेरोजगार यांच्या प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नेते, माजी जिप सभापती तथा तालुका खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर (collector office) भव्य लक्षवेध आंदोलन (lakshyvedh andolan) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शासकीय आधारभूत योजनेंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 1 हजार रुपये बोनस देण्यात यावा, कोनसरी येथील लोहप्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा, वडसा – गडचिरोली – आष्टी कागजनगर असा रेल्वे मार्ग निर्माण करावा, मेडिगट्टा व गोसीखुर्द धरणाच्या पाण्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करावी आदी प्रलंबित समस्यांकडे शासन, प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आणि त्या समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.