गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते नागपूर पैदल मोर्चाला सुरुवात

58

– जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते नागपूर पैदल मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाला जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हजारोंंच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देेेत मोर्चात सहभाग नोंंदविला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जिवन पा. नाट, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, धानोरा तालुकाध्यक्ष परसराम पदा, भामरागड तालुकाध्यक्ष लक्समिकांत बोगामी, मुलचेरा तालुकध्यक्ष प्रमोद गोटेवार, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, एटापली युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन नामेवार, दिलीप घोडाम, अब्दुल पंजवाणी सह हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी काँग्रेस नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.