रानटी हत्तीच्या धुमाकुळीने शेतकरी बांधवांच्या धान्य पिकांची नुकसानीची त्त्वरीत भरपाई द्या

82

– वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ डिसेंबर २०२२ : कुरखेडा तालुक्यात मागील अनेक दिवसापासून रानटी हत्तीने धुमाकूळ माजविला. त्यात कुरखेडा तालुक्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात धान्य पिकांची नासाडी करत आहेत. रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्यातील खैरी, चांदागड, वाघेडा, आंधळी, नवरगाव, बेलगाव, चिखली, चिचटोला, पळसागाव, चारभट्टी व कुरखेडा परिसरातील जिल्ह्यातील गावातील शेकडो शेतकरी बांधवांचे उभ्या असलेल्या धान्य पिकांचे काही ठिकाणी घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केली . त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत असून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्या, या मागणीसाठी राज्याचे वन तथा सांस्कृतिक कार्य मत्सव्यवसाय मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेवुन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी निवेदन सादर केले व चर्चा केली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा शहर अध्यक्ष रविद्र गोटेफोडे, नगरसेवक सागर निरकांरी उपस्थित होते.
भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांना गावकरी यांनी आंधळी, नवरगाव, वाघेडा परिसरात गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती दिली होती. त्या अनुसंगाने चांगदेव फाये यांनी आंधळीचे उपसरपंच अप्रव भैसारे, दिंगाबर नाकाडे, उध्दव पाटील कवाडकर, रमेश पिल्लारे, जगदिश मानकर, ग्रा प सदस्य किरसान यांच्यासह गावकरी बांधवासोबत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनविभागाचे कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे केले. पंरतु अद्यापही मदत मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असल्यामुळे वन विभागाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार, आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडे केली आहे. वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी लवकरच मदत वाढवून देवूू, असेही सकारात्मक उत्तर दिले.