चामोर्शी येथील प्रभाग ३ येथे घरकुलाच्या कामाला जोरात सुरुवात

57

– प्रभागातील ६० घरकूल मंजुरीच्या प्रतीक्षेत, २१ घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात

– दिला शब्द केला पूर्ण : नगरसेवक आशीषभाऊ पिपरे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ डिसेंबर २०२२ : चामोर्शी येथील नगरपंचायत येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे व नगरसेविका सोनालीताई पिपरे यांच्या प्रभाग क्रमांक तीन येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी ८५ घरांना मंजुरीसाठी टाकले होते. त्यापैकी २१ घराना मंजुरी मिळाली व सर्व घरांच्या प्रत्यक्ष कामांंना नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, नगरसेविका सोनालीताई पिपरे, सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांच्या हस्ते धडाक्यात सुरुवात करण्यात आले. यामुळे प्रभाग क्रमांक तीन येथे नागरिकात आनंदाचे वातावरण आहे व लवकरच उर्वरीत घरकुलाचे कामास मंजुरी मिळाल्यानंतर खासदार अशोकभाऊ नेते यांच्या हस्ते समस्त कामांना प्राधान्य देऊन सुरुवात करण्यात येईल, असे नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारात आपण येथील गोरगरीब जनतेला गेल्या इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित होता. सदर समस्या आपण स्वतः पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गावठाण प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री महोदय यांनी गावठाणाची समस्या दूर केली व तमाम महाराष्ट्र राज्यातील गावठानाची अट रद्द होऊन सदर समस्या दूर होऊन तमाम जनतेचे घरकुलाचे प्रश्न मार्गी लागले. याबद्दल जनतेने खासदार अशोकभाऊ नेते, नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांचे आभार मानले.