चिचडोह बॅरेज येथील जमीन अधिग्रहणाकरिता ६ कोटी रुपये मंजूर

51

– चिचडोह बॅरेज येथे शेती अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांच्या निधीचा प्रश्न नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी लावला मार्गी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १४ डिसेंबर २०२२ : चामोर्शी येथील शेकडो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या चिचडोह ब्यारेज येथे तालुक्यातील शेकडो शेतकरी यांचे शेतजमीन बॅरेज प्रकल्पात गेली आहे. सदर जमीन राज्य सरकारने अधिग्रहण केली होती व काही शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक मोबदला मिळाला होता व काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. परंतु सदर अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचा विषय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर थंड बस्त्यात गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन या विषयावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनात येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी मंत्रालय मुंबई येथे अविरत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला व उपमुख्यमंत्री महोदय यांनी तत्काळ कारवाई करून आपले खाजगी सचिव यांना तत्काळ निधी मंजूर करण्याचे लेखी निर्देश दिले व तसे सूचना जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना चिचडोह बॅरेज येथील जमीन अधिग्रहण करून उर्वरित शेतकरी यांना जमिनीचा मोबदला निधी ६ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेली आहे व त्यांना जमिनीचा अजूनही मोबदला मिळाला नाही त्यांनी नगरसेवक आशीषभाऊ पिपरे व सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर अधिग्रहित जमिनीचा मोबदला येथील शेतकरी बांधवांना मिळवून दिल्याबद्दल खासदार अशोकभाऊ नेते, नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांचे आभार मानले.