गोकुलनगर न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

82

– भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १४ डिसेंबर २०२२ : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री, आदिवासी सेवक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोकुलनगर येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने केक कापुन प्रमोद पिपरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रमोद पिपरे म्हणाले, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून गोकुलनगर नप शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून लवकरच निविदा काढून इमारतीचे बांधकाम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज इमारत उभी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भाजपचे शहर महामंत्री विनोद देवोजवार, माजी नगरसेवक तथा शहर महामंत्री केशव निंबोड, भाजयुमो चे शहर महामंत्री हर्षल गेडाम, झोपडपट्टी आघाडीचे श्यामजी वाढई, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, ओबीसी महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, माजी नगरसेविका नीता उंदिरवाडे, लताताई लाटकर, ज्योती बागडे, कोमल बारसागडे, पूनम हेमके, युवा मोर्चाचे निखिल चरडे, राजू शेरकी, युवा नेते संजय मांडवगडे, देवाजी लाटकर, विजय शेडमाके, रामन्ना बोनकुलवार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.