गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा विकास हा एकच ध्यास : आमदार डॉ. देवरावजी होळी

74

– पत्रकार भवन गडचिरोली येथे वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार कार्यक्रम

– भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे व आ. कृष्णाजी गजबे उपस्थिती दर्शवून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० डिसेंबर २०२२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २ वेळा आमदार होण्याची संधी मला जनतेने दिली. या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या आशीर्वादाने मला हे शक्य झाले. त्यांच्या आशीर्वादाचे ऋण उतरविण्याची जबाबदारी माझी असून या विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा एकच ध्यास आपण घेतला असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी येथील पत्रकार भवन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना दिली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे व आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवून आमदार महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मंचावर भाजपा जिल्हा संघटन महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे नेते हेमंतभाऊ जंबेवार, जेष्ठ भाजपा नेते रमेशजी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी केशवरावजी दशमुखे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सभापती रंजीताताई कोडापे, भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, शहराचे माजी अध्यक्ष सुधाकरजी येनगंधलवार, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, जिल्ह्याचे भाजप नेते डॉ. भारत खटी, तालुक्याचे संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर, तालुका महामंत्री हेमंतजी बोरकुटे, शहर महामंत्री तथा माजी न. प. पाणी पुरवठा सभापती केशव निंंबोड, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. कविताताई उरकुडे, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष अर्चनाताई निंबोड, वाकडीचे माजी सरपंच बोरकुटे पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सत्काराप्रसंगी जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी पिपरे, रमेशजी भुरसे, योगिताताई पिपरे, मारोतरावजी ईचोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मागील सात- आठ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत असून यापुढे आपले प्रयत्न अविरत सुरू राहतील. या विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा एकच ध्यास आपण घेतलेला असून विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सातत्यानं काम करू, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.