वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेची अखेर मृत्यूची झुंज संपली

34

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ९ डिसेंबर २०२२ : नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथील महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात आज, ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला.४ डिसेंबरला आंबेशिवनी येथे नरभक्षी वाघाने सोनम उंदीरवाडे या 25 वर्षीय महिलेवर हल्ला केला. यात ती महिला गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावर सुरवातीला गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर तेथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात भरती करण्यात आले. अखेर पाच दिवसानंतर तीची मृत्यूची झुंज संपली असून अखेर तीचा मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यात प्राणी व मनुष्य यांचा संघर्ष आता वाढला असल्याने नागरिकांना वाघाच्या दहशतीत जीवन जगावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.