उद्या वालसरा येथे संताजी महाराज जयंती उत्सव

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ डिसेंबर २०२२ : जय संताजी स्नेही मंडळ वालसराच्या सौजन्याने संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती उत्सवाचे आयोजन उद्या ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जि. प. अध्यक्ष योगोताताई मधुकर भांडेकर तर अध्यक्ष म्हणून माजी पं. स. सभापती सुनिताताई सुरेशराव भांडेकर हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन वालसराचे पो. पा. भगीरथ भांडेकर, मधुकर भांडेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष लक्ष्मणराव वासेकर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. संताजी जगनाडे महाराज तेली समाज कार्याध्यक्ष घनश्याम लाकडे, कोषाध्यक्ष रविंद्रजी ठाकरे, कृषी पर्यवेक्षक मनोहरजी दुधबावरे,दर्शनी मालचे उडान, अविनाश बारसागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संताजी स्नेही मंडळ वालसराच्या वतीने करण्यात आले आहे.