विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ डिसेंबर २०२२ : संताजी तेली समाज आमगाव (म.) ता. चामोर्शी, जि. गडचिरोलीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन उद्या, ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि. प. कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष योगोताताई भांडेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर केशव भांडेकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख वक्ते म्हणून बी. एम. टी. एस. महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जय संताजी बहु. संस्था तेली समाज गडचिरोली जिल्हाध्यक्ष लताताई कोलते व प्रमुख वक्ते म्हणून वैशालीताई अमितकांत दुरबुले हे लाभणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष विठ्ठल कोठारे, निलेश संपत कुनघाडकर , ताठ आयोजक जय संताजी तेली समाज बांधव आमगाव (म.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.