इंदिरानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

102

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली, ६ डिसेंबर २०२२ : येथील इंदिरानगर वॉर्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज, ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तथागत बौध्द समाज मंडळ इंदिरानगरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून किरण उराडे, सचिन पाटील, शेषराव तुरे, सौ. थोरात मॅडम, सौ. संगीता मेश्राम, सौ. उषा डोंगरे, सौ. रोहीणी उंदिरवाडे, अंजली साखरे, सौ. आशा पाटील, सौ. नम्रता खोब्रागडे, सौ. स्नेहा मेश्राम, सौ. उषा पेटकर, सौ. चानी पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात महिला मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली. ध्वजारोहन करून त्रिसरण-पंचशिल ग्रहण करण्यात आले. यावेळी किरण उराडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच मान्यवरांनी आपआपली मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन शेषराव तुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तथागत बौध्द समाज मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य पुरूष व महिला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून अभिवादन केले.