भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ५ डिसेंबर २०२२ : भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या गडचिरोली शहराध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई निंबोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली शहर महिला आघाडीचे अध्यक्ष कविता उरकुडे यांनी केली.
त्यांनी आपले नियुक्तीचे श्रेय खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओलालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना दिले आहे.
यावेळी अर्चना निंबोळ यांनी भाजपचे कार्य, केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवून महिलांच्या वार्डातील अडचणी, समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.