नाम. नरहरी झिरवाळ व आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ डिसेंबर २०२२ :19 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे (ratravadi congress party) राज्यातील विविध मागण्यांना घेवून राज्य सरकारच्या विरोधात राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी विदर्भातून जास्तीत जास्त संख्येने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन आणि या संदर्भात नियोजन व तयारीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नामदार श्री. नरहरी झिरवाळ narhari Zirwal), माजी राज्य मंत्री तथा आमदार श्री. संजय बनसोडे (sanjay bansode) यांच्या मुख्य उपस्थितीत ५/१२/२०२२ दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, कॅनेरा बँक समोर, चामोर्शी रोड, गडचिरोली.येेेथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे पॅरेंट/महीला/युवक/युवती/सेवादल/विद्यार्थी तसेच पक्षाच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा/तालुका/शहर अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.