कृषी पंपाविषयी राज्य सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना उपयुक्त व लाभदायक : खा. अशोकजी नेते

51

– खा. अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या मागणीला अखेर यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या कृषी पंपाविषयी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा व उपयुक्त व लाभदायक निर्णय आहे. खासदार अशोकजी नेते यांनी १ ऑक्टोंबर २०२२ ला जिल्हा वार्षिक नियोजन समिती गडचिरोलीच्या बैठकीमध्ये मागणी केलेली होती. या अनुषंगाने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आभार व्यक्त करत निर्णयांचे स्वागत केले. राज्य व केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं व जनकल्याणासाठी आहे, असे यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी आपले मत व्यक्त केले.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा होणार आहे. महावितरणला ३० नोव्हेंम्बर रोजी आदेश जारी केल्याने मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा तसेच मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार वने मंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचे आभार खासदार अशोकजी नेते यांनी मानले.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दि.३० नोव्हेम्बर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका असल्याने तसेच कृषीपम्पासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धते मुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नसल्याने कृषीपम्पासाठी रोज ८ तासांच्या वीज उपलब्धते ऐवजी या जिल्ह्यातील कृषीपम्पाना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन खासदार श्री. अशोकजी नेते यांनी केले.