हंसराज अहीर यांच्या स्वागतार्थ आज चंद्रपुरात ‘धन्यवाद तथा कृतज्ञता’ सभा

97
विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर, २ डिसेंबर २०२२ : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहीर (hansraj Ahir) यांनी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचे 3 डिसेंबर 2022 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमन होत असून भाजपा, भाजयुमो व पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था संघटना, ओबीसी मागासवर्गीय संघटनांव्दारे खांबाडा पासून विविध शहरात भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल भाजपा प्रधानमंत्री माननिय नरेंद्रजी मोदी (narendra modi) व भाजप श्रेष्ठींना धन्यवाद देण्याकरिता तसेच या सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा, भाजपा महीला आघाडी, भाजयुमो अनु. जाती मोर्चा, अनु. जमाती मोर्चा व अल्पसंख्यक मोर्चाव्दारे 3 डिसेंबर रोजी चंद्रपुुरातील गांधी चौकात धन्यवाद व कृतज्ञता सभेचे सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्याचे वने तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar), भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule), खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार बंटी भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तत्पुर्वी हंसराज अहीर यांचे शासकीय विश्रामगृहात भाजपा महिला आघाडीच्या वतीने औक्षण केल्यानंतर हजारो कार्यकर्ते व प्रशंसकांच्या उपस्थितीत सभेच्या व्यासपीठावर आगमन होणार आहे. तरी महानगरातील नागरिकांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.